ग्रामपंचायत आघार खुर्द

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

माहिती

आघार खुर्द हे मालेगाव तालुक्यातील मध्यम लोकसंख्येचे गाव असून येथे अंदाजे ३२६७ लोकसंख्या आहे. गावातील मुख्य उत्पन्नाचे साधन शेती, पशुपालन व लघुउद्योग असून लोकांचा उपजीविकेसाठी हा प्रमुख आधार आहे. पिण्याच्या व शेतीसाठी पाण्याचा पुरवठा विहीर व नळयोजना द्वारे केला जातो. गावात विविध धार्मिक व सांस्कृतिक परंपरा पाळल्या जातात आणि गणेशोत्सव, दिवाळी, पोळा, होळी हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गावाजवळील श्रीक्षेत्र सिद्धेश्वर मंदिर हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून येथे भक्तांची व पर्यटकांची वर्दळ दिसून येते.

२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार आघार खुर्द लोक्संख्याचा संक्षिप्त आढावा दिला आहे.

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
अ.क्र. तपशील एकूण पुरुष (अंदाज) स्त्री (अंदाज)
एकूण लोकसंख्या ३२६७ १६७६ १५९१
बाल लोकसंख्या (०-६ वर्षे अंदाजे 10%) ३२७ १६८ १५९
अनुसूचित जाती (SC अंदाजे 4%) १३१ ६८ ६३
अनुसूचित जमाती (ST अंदाजे 18%) ५८८ २९९ २८९
साक्षर लोकसंख्या (अंदाजे 72%) २३५२ १२४४ ११०८
निरक्षर लोकसंख्या ९१५ ४३२ ४८३

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी